जिंदगी...

जिंदगी...
अस म्हणल की गुलजारचा भारदस्त आवाज मोहीत करून फ़ार जुन्या खोल वातावरणात घेउन जातो.
समुद्रकिनार्यावर उधळणार्या लाटा आठ्वतात आणि एक वेगळ्याच जगात मी जातो.
पाणी माणसाला वेड करत म्हणतात. मी तर मराठवाड्यातला त्यामुळे कदाचित मला समुद्राची ओढ अधिक असेल.
शांत पसरलेला किनारा अन रात्रीची वेळ. शिरशिरता वारा अन चंदेरी लाटा. निव्वळ वेड लावणार वातावरण... अशा वातावरणात
आपल्या जिवलग मित्रांसोबत घालवलेले क्षण...
आणि तो मैतरही माझ्याच मातीतला
मी आणि तो, घरापासून कैक अंतरावर गळ्य़ात गळे घालून फ़िरलो, सर्व मुलींच्या आठवणी काढल्या आणि शेवटी सागराच अनंत चांदण पीत शांत उभे
राहिलो. सगळेच क्षण बोलके नसतात. काही क्षणांना शांतताच हवी असते...
मित्रा आता आपण भलेही हजारो मैल दूर आहोत पण आपल्या जोडणारा सागर किनारा अजूनही आहे तिथे!! :)
आजही एखाद्या बेसावध क्षणी मद्रासचा समुद्र मनात लाटांच तुफ़ान उठवत जातो...

पायात अडकणारे शिंपले, किनार्यावर खेळणार्या लाटा,
चांदण्यातला गारवा, अंधारल्या वाटा,
फ़िकट पांढर्या प्रकाशात,अर्धवट पेंगुळलेला ओळखीचा डांबरी रस्ता,
आणि मित्रासोबत पलंगापासून ते तार्यांपर्यंतच्या कुठल्याही गप्पा करत ,झोंबणर्या वार्यातून चालत जाण...

मय बरसती है, फ़जाओं मे नशा तारी है..
मेरे साकी ने कही जाम उछाले होंगे...
जिनके होटो पे हसीं, पाव मे छाले होंगे,,,
हा वही लोग, हा वही लोग तेरे चाहने वाले होंगे...

Comments

Unknown said…
waa..mitra...kya baat hai
chhaan lihilay manaatla
Pushkaraj said…
hey buddy... kal achaan suchlaa..
Vijay Albal said…
excellent mitra ..... tu hindi gulaar nahis pan marahi Ou.La.jaar aahes :)

Popular Posts