आठ्वणींच्या वाटेवर

आज तुझ्यासोबतचा अर्धा तास, विद्यापिठाचा परिसर हिरवी वाट
तेवढीच सोबतसुद्धा सुंदर होती... आठवणींचा त्रास न होणारी सोबत...
आपल्या गप्पा किती जुळून आल्या होत्या नाही! तो अर्धा तास एखाद्या उदाबत्तीसारखा ,
बोलण तसा किती साध होत! आणा-भाका नाहीत, प्रेमाच्या गप्पा नाहीत, फक्त तू आणि मी ,
प्रत्येक क्षण मी जगत होतो, तुला डोळ्यात साठवत होतो , तू हसतांना ,जुन्या मालिकांच्या ओळी गुणगुणतांना, समाधानानी हलकेच हसणारे तुझे डोळे, मी पकडलेला हात, आपण निरुद्देश त्याच विद्यापीठाच्या रस्त्यांवरून चालता राहण, बाकी जगात राहूनसुद्धा त्या शांततेत फक्त तू आणि मी होतो, फक्त तू आणि फक्त मी...
आजही माझा श्वास थांबतो, एक हुरहुर लागते, अस वाटत की जोरात आभाला कोसळाव आणि आपण भेटाव
दोघानी पुन्हा एकदा गप्पा सुरु कराव्यात ....
आपण आज सोबत नाही , पण "तू" सोबत आहेस... विद्यापीठाच्या वाटांमधून...
तुझ आणि माझ वेगळ होण जेवढ़ खर, तेवढीच तीसोबत ही खरी ...
मी अजूनही सुगंधीत होतो , या आठवणी दरवळताना

Comments

Pbonds said…
I wish u become FUN(ny) and ROAM(eo) so that u can enjoyy !!!

Popular Posts