सगळच कस व्हर्चुअल???

माझा आनंदपण? परिक्षा संपली, घरी आलो. आल्या आल्या थोडा शांत झालो, जेवलो. पण आता मात्र मी फ़ेसबुकवर जाउन ओरडणार... हुर्ये exam over! अस कस? आणि का? मी याला गैर म्हणत नाहीये...पण जो जोष आणि आंनद फ़ेसबूक दाखवतोय तो प्रत्यक्षात का नाही? आणि मग तिथेच का?
फ़ेसबूकवर ’आवडले’ ला क्लिक करायच,प्रतिक्रिया द्यायच्या आणि प्रत्यक्षात मात्र आता ई-मेल सुद्धा नाही! परवा मी माझ्या मित्राला ई-मेल लिहिला तर अस वाटत होत की पत्र लिहितो आहे!! (आता मुळात पत्र लिहिण्याचा अनुभव माझ्याच पिढीतल्या मोजक्य जणांना आहे.. तिथे बाकी लोकांना काय बोलणार)
नवीन तंत्रद्यान खूप मस्त आहे, छान आहे, सगळ्यांपर्यंत पोचतापण येत, पण जिव्हाळा आपला आपल्यालाच जपावा लागतो नाही का?
अस वाटत की आजकाल जिव्हाळा जपण हे सुद्धा खर तर किती सोप आहे! आणि खर सांगू, किती जरी म्हणालात ना तरी मला तर हा सरळ सरळ फ़क्त आळशीपणा वाटतो.(कधी कधी).
सगळ उपलब्ध असतांना संवाद कमी होतो आहे आणि माहीती वाढते आहे. अर्थात हा प्रचंड वादाचा मुद्दा आहे.
पण किती जरी शेखी मिरवली ना तरी मित्रांनी college canteen वर घेतलेल्या चहाची सर scrap,wall किंवा shared अल्बम येत नाही. त्यांनी जाग्या होतात त्या फ़क्त आठवणी! पण त्यांच्यामध्ये आठवणी निर्माण करण्याच सामर्थ्य नाही. ते खरोखरच फ़क्त दुवे आहेत, वास्तवाची जाणीव करून देणारे...
मित्रांचा दंगा, आवडत्य पोरींवरून त्याची आपण (आणि आपली त्याने!)काढलेली छेड हे वास्तव या गिगाबाईट्च्या लाईन मधून कधी निर्माण होवू शकत नाही ना. त्याची खंत नसावी! फ़कस्त जाणीव ठेवावी हे बर नाही का?? :)
तसा या सगळ्याचा फ़ायदा मला झालाच आहे की. जवळच्यांचे फ़ोटो बघतांना थोडा तरी अशंत: तिथे असल्याचा भास निर्माण होतोच! आणि ते ही काही कमी नाही. त्याने प्रत्यक्ष भेटीची भूक वाढते आणि मित्रांना ’प्रेमळ’ निरोप जातात...
’*** लग्न झाल तर विसरलास काय’ आणि आठवणी,गप्पा आणि धिंगाणा पुन्हा जागा होतो.
पालथ्या घातलेल्या टेकड्या, पाहिलेले सिनेमे, टवाळकी सगळ्यांची उजळणी होते, नवे बेत आखले जातात.
महफ़ील जमते, कधी फोनवर जमते,कधी नेटवर पण जमते... कधी नुसतीच आठवणीत जमते, पण जमतेच.
सकाळपासून डोळ्यांसमोर नाचणारा कर्सर ब्लिंक करायच बंद करतो आणि एकदाचे आपण बाहेर पडतो.
सूर्य कधीच बुडालेला, रस्त्यावर गर्दी,डोक्यात प्रोजेक्ट्च्या चिंता... रिंग वाजते, आपण म्हणतो
आज नको रे...साला भेजा खराब झालाय.नेटवर भेटू. रविवारचा वादा होतो.आणि आपण उत्साहाने नेट वर येउन त्याला सगळा पाढा वाचून दाखवतो... काय खर आणि काय खोट.. अनुभव आजकाल बाईट मध्ये येतात आणि रिआलिटी बाईट करेनाशी झाली आहे. पाण्याची टंचाई भेडसावत नाहे ईतकी सवयीची झाली आहे,पण नेट कनेक्शन जाउ देत. आपण शेर होतो ते फ़क्त customer care वाल्या आपल्याच सारख्या पोरांवरती. पण कम्युनिटी जमण्यात मात्र आपण एकदम नंबर वन हां!!
अपनी तो तैराकी उल्टी है,
धारा मे मुर्दे बह लेते है...

Comments

Chaitanya said…
shuddhalekhan sudhara saheb!
but baaki apratim lihile aahe..
oghavti bhasha, aani saral vichar.. aavadle :)
barobar bolalas Pushkar....reality and vastavik goshtina sodun jo to virtual jagat jast jagu lagala ahe...facebook tyachach bhag..agadi kal mazya dusrya room madhe rahnarya..roommate la mi birthday wish karnyasathi facebook var scrap takla...pan room madhe javun wish karayche kashta nahi ghetle....aso.
Pushkaraj said…
:) uttya - barobar bolalas :)

Popular Posts